CBSE Class 12 Result 2022: CBSE 12वीचा निकाल जाहीर झाला, येथे तपासा

शुक्रवार, 22 जुलै 2022 (09:57 IST)
CBSE Class 12 Result 2022:CBSE बोर्डाच्या परीक्षेच्या निकालाची वाट पाहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बोर्डाने आज बारावीचा निकाल जाहीर केला. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने(CBSE) ने शुक्रवारी इयत्ता 12 वी परीक्षेचा निकाल जाहीर केला. 12 वी बोर्डाच्या परीक्षेत 92.71 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.    
सीबीएसई च्या बारावीच्या परीक्षेत यंदा ही  मुलींनी बाजी मारली, 94.54% मुली उत्तीर्ण झाल्या. परीक्षेचे निकाल CBSE बोर्डाच्या अधिकृत संकेत स्थळावर पाहू शकता. विद्यार्थी त्यांच्या परीक्षेचा निकाल अशा प्रकारे तपासू शकतात -
 
विद्यार्थी प्रथम बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in ला भेट द्या 
आता मुख्यपृष्ठावर दिसणार्‍या 10वी किंवा 12वीच्या निकालाशी संबंधित लिंकवर क्लिक करा.
आता तुम्ही एका नवीन पेजवर याल.
येथे तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख यासारखी विनंती केलेली माहिती प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
आता तुमचा निकाल तुमच्या स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
निकाल डाउनलोड करा आणि पुढील संदर्भासाठी त्याची प्रिंट काढा.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती