Amazon Alexa आता अधिक स्मार्ट, कॅबपासून तर रेस्टॉरंटपर्यंत बुकिंग करण्यात समर्थ

शनिवार, 8 जून 2019 (15:29 IST)
व्हर्च्युअल असिस्टंटबद्दल आपल्याला माहीत तर असेलच आणि जर नाही तर चला आम्ही आपल्याला याबद्दल सांगू. व्हर्च्युअल असिस्टंट हे एक आभासी असिस्टंट आहे, जे आपल्याला दिसणार तर नाही परंतु आपल्या इशाऱ्यावर आपले सर्व कार्य निश्चितपणे करेल. व्हर्च्युअल किंवा डिजीटल असिस्टंटक हे उदाहरण म्हणून आपण Amazon Alexa, Google Assistant आणि Apple Siri बघू शकता. 
 
काही वर्षांपूर्वीपर्यंत बाजारात ब्लूटुथ स्पीकर प्रभावी होते पण आता स्मार्ट स्पीकर्स येऊ लागले आहे. या स्मार्ट स्पीकर्समध्ये Google Assistant, Apple Siri आणि Amazon Alexa चा सपोर्ट दिला जात आहे. आतापर्यंत हे व्हर्च्युअल असिस्टंट व्हॉईस कमांडवर गाणी प्ले करत होते पण आता ते इतके स्मार्ट झाले आहे की ते आपल्या कमांडवर हॉटेल बुक आणि आपल्यासाठी खरेदी करू शकतात. 
 
आता जगातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स कंपनी Amazon ने आपल्या डिजीटल असिस्टंट अॅलेक्साला अधिक स्मार्ट बनवलं आहे. अमेझॅन अॅलेक्सा आता आपल्या व्हॉईस कमांडवर विकेंडवर आपल्यासाठी संध्याकाळची संपूर्ण तयारी करू शकतो. तथा अॅलेक्सासाठी सध्या याचे अपडेट सादर नाही केले गेले आहे पण आशा आहे की कंपनी लवकरच त्याचे अपडेट सादर करेल. अमेरिकेच्या लास वेगास मध्ये चालत असलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॉन्फ्रेंसमधून Amazon Alexa च्या या योग्यतेबद्दल माहिती मिळाली आहे. बातम्या तर अश्या देखील आहे की अॅलेक्सा भारतीय वापरकर्त्यांसाठी हिंदी देखील शिकत आहे. अशा प्रकारे Amazon ला भारतीय स्मार्ट स्पीकर बाजारात आपली पकड मजबूत करण्यात मदत होईल.
 
कॉन्फ्रेंस दरम्यान Amazon ने Alexa चा प्रजेंटेशन देखील दिला ज्यात अॅलेक्साला चित्रपट तिकीट बुक करण्यास सांगितले गेले होते. यानंतर अॅलेक्साने वापरकर्त्याला विचारलं की वापरकर्ता सिनेमागृह जवळील रेस्टॉरंटमध्ये खाणार देखील का? वापरकर्त्याने होय उत्तर दिल्यावर अॅलेक्साने रेस्टॉरंटमध्ये डिनर टेबल बुक केलं आणि मग विचारलं की आपण रेस्टॉरंटमध्ये जाण्यासाठी टॅक्सीचा वापर कराल का? होय उत्तर मिळाल्यावर अॅलेक्साने उबर कॅब बुक करून दिली. अॅलेक्सा केवळ आपल्याला उत्तर देत नाही, परंतु ते आता आपल्याला सल्ला देखील देत आहे. हे सर्व आर्टिफिशियल इंटेलिजेन्समुळेच होत आहे.   

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती