रिलायंस जियो गीगाफायबर कनेक्शन देण्यापूर्वी ग्राहकांना सिक्योरिटी म्हणून 4,500 रुपये घेत होता परंतू कंपनीने नवीन सेवा अंतर्गत सिक्योरिटी डिपॉजिट कमी करुन केवळ 2,500 रुपये केले आहे.
तसं तर Jio GigaFiber अजून अधिकृत रीत्या लाँच झालेले नाही तरी देशभरातील अनेक शहरांमध्ये याची टेस्टिंग सुरू आहे. टेस्टिंग म्हणून ग्राहकांना जिओ गीगाफायबर कनेक्शन दिले जात आहे. आता पर्यंत हे कनेक्शन घेण्यासाठी ग्राहकांना 4,500 रुपये सिक्योरिटी म्हणून द्यावे लागायचे तर आता केवळ 2,500 रुपये द्यावे लागतील. तसं तर ही रक्कम देखील नंतर वापस मिळेल.