आला अस्सल भारतीय ‘फौजी'

गुरूवार, 4 फेब्रुवारी 2021 (08:08 IST)
‘पब्जी'ने तरुणाईला वेड लावलं होतं. मात्र अनेक चिनी अॅप्ससह ‘पब्जी'वरही बंदी घालण्यात आली. त्यानंतर अस्सल भारतीय बनावटीच्या ‘एफएयू-जी' म्हणजेच ‘फौजी' गेमची घोषणा करण्यात आली. तेव्हापासूनच गेमिंगचे चाहते या गेमची आतुरतेने वाट बघत होते. आता तो क्षण आला असून ‘एफएयू-जी' गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध झाला आहे. 
 
हा गेम भारत आणि चीनदरम्यानच्या गलवान खोर्या‘तील संघर्षावर आधरित असून जबरदस्त ग्राफिक्समुळे गेम खेळताना खूप मजा येणार आहे. यात ‘कॅम्पेन मोड'सह ‘टीम डेथमॅच' आणि ‘फ्री फॉर ऑल' असे मोड्‌स मिळतील. ‘एन कोअर गेम्स'ने ‘फौजी'ची निर्मिती केली असून येत्या काळात यात ‘बॅटल रॉयल' आणि ‘ऑनलाइन मल्टीप्लेअर मोड'ही उपलब्ध होणार आहेत.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती