Airtel 5G Plus या शहरांमध्ये लॉन्च, जाणून घ्या याचे फायदे

मंगळवार, 25 ऑक्टोबर 2022 (14:42 IST)
Airtel 5G Plus ची सेवा भारतात गेल्या गुरुवारपासून सुरू झाली आहे आणि Airtel देशात 5G स्पीड सेवा देण्यासाठी सज्ज आहे. सुरुवातीच्या टप्प्यात, दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद, सिलीगुडी, नागपूर आणि वाराणसी येथील ग्राहक Airtel 5G Plus चा लाभ घेऊ शकतील. या आठ शहरांमध्ये 5G सक्षम स्मार्टफोन असलेले विद्यमान Airtel ग्राहक आता कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय विद्यमान डेटा प्लॅनवर Airtel 5G Plus चा अनुभव घेऊ शकतील. 2023 च्या अखेरीस उर्वरित शहरी भारतामध्ये ही सेवा अपेक्षित आहे, ज्यामुळे हे 5G रोल-आउट भारतातील सर्वात जलद रोल-आउटपैकी एक होईल.
 
जाणून घ्या Airtel 5G Plus चे फायदे
Airtel 5G Plus चे ग्राहक आता 5G नेटवर्कवर जवळपास 30 पट वेगाने इंटरनेट सेवेचा आनंद घेऊ शकतात. याशिवाय कंपनीकडून असेही सांगण्यात आले आहे की एअरटेल 5जी प्लसचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमचे सिम बदलावे लागणार नाही. तुम्ही तुमच्या Airtel 4G सिममध्ये कोणत्याही 5G डिव्हाइसमध्ये 5G सेवा मिळवू शकता. 5G च्या आगमनाने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात क्रांती होणार आहे. आता लोक 5G च्या वेगवान इंटरनेट स्पीडवर वेळ वाचवून त्यांची सर्व कामे सहज करू शकतात. उदाहरणार्थ ते त्यांच्या कार्यालयीन कामातून ऑनलाइन लाईव्ह स्ट्रीमिंग, गेमिंग, हाय स्पीड डाउनलोडिंग इत्यादी करू शकतील.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती