पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6th India Mobile Congress दिल्ली येथे 5G सेवेचा शुभारंभ केला. यानंतर अनेक टेलिकॉम ऑपरेटर्सनी देशातील अनेक शहरांमध्ये 5G ची चाचणी केली आहे आणि त्यांना खूप वेग मिळत आहे. अनेक लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहेत की त्यांचे हँडसेट 5G ला सपोर्ट करतील की नाही. दरम्यान, Airtel ने 116 स्मार्टफोन्सची यादी जारी केली आहे, जे 5G ला सपोर्ट करतील.
एअरटेलने अलीकडेच देशातील 8 शहरांमध्ये आपली 5G सेवा सुरू केली आहे. एअरटेलने दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, सिलीगुडी, नागपूर आणि वाराणसी येथे 5G सेवा सुरू केली. जर तुमच्या हँडसेटचे नावही या यादीत असेल तर तुम्हाला अजून थोडी प्रतीक्षा करावी लागेल. टेलिकॉम ऑपरेटर तुम्हाला 5G अॅक्सेस करण्यापूर्वी सॉफ्टवेअर अपडेट देईल.