अबब, तब्बल १४ अब्ज व्हॉट्सअ‍ॅप संदेशाने झाले नववर्षाचे स्वागत

भारतामध्ये नववर्ष स्वागत सर्वाधिक तब्बल १४ अब्ज व्हॉट्सअ‍ॅप संदेश पाठवून झाले आहे. यात ३२ टक्के संदेश हे छायाचित्र, व्हिडीओ, जीआयएफ फाइल आणि व्हाइस मेसेजचा समोवश असल्याचे फेसबूकची मालकी असलेल्या संदेशवहन अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपने स्पष्ट केले.

भारतीयांनी पाठविलेल्या संदेशांमध्ये तब्बल ३ अब्ज १० कोटी छायाचित्रे, सात कोटी जीआयएफ फाइल्स आणि सहा कोटी दहा लाख व्हिडीओज पाठविण्यात आल्याचे व्हॉट्सअ‍ॅपने स्पष्ट केले आहे.

वेबदुनिया वर वाचा