13 ऑक्टोबरपासून ‘फ्लिपकार्ट’चा ‘बिग बिलियन सेल’

ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टने आपल्या ‘बिग बिलियन सेल’च्या दुसर्‍या सीझनची घोषणा केली आहे. हा सेल 13 ऑक्टोबरपासून 17 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. 70 पेक्षा अधिक उत्पादनांवर विशेष सूट देण्याची घोषणा कंपनीने केली आहे. मात्र, ही सूट केवळ अँपवरुन खरेदी करणार्‍या ग्राहकांनाच मिळणार आहे. या पाच दिवसांच्या आयोजनादरम्यान फ्लिपकार्ट आणि मिंत्रा हे ‘बिग बिलियन डेज’मध्ये भागीदारी करणार आहेत. दरम्यान, मागील वर्षी कंपनी तांत्रिक गोंधळामुळे ‘बिग बिलियन डे’ सेलमध्ये ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करु शकलं नव्हतं.

वेबदुनिया वर वाचा