‘एलो’ मेसेंजिंग अँप सुचवणार शब्द

शनिवार, 28 मे 2016 (16:06 IST)
आजच्या जगात स्मार्टफोनची क्रेझ जोरात असून जे ते ह्या ना त्या अँपशी जोडले गेलेले आहेत. जसे काही अँप हे त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटकच आहे. या अँपमध्ये प्रामुख्याने व्हॉट्सअँप, फेसबुक मेसेंजर, हाईक आदी मेसेंजर अँपची चलती असून या सर्वात व्हॉट्सअँपच आघाडीवर आहे.
 
त्यातच आपले स्थान टिकविण्यासाठी दिवसेंदिवस व्हॉट्सअँप आणि तत्सम मेसेंजर अँप वापरणारे वाढतच आहे. पण या स्पर्धेत आता जाइंट सर्च इंजिन गुगलने पुन्हा उडी घेतली असून एलो नावाचे स्मार्ट मेसेन्जिंग अँप आणण्याची तयारी गुगलने केली आहे. गुगलने या अँपमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर केल्याचा दावा केला आहे. समजा तुम्हाला एखाद्या मेसेजला रिप्लाय द्यायचा असल्यास हे अँप तुम्हाला शब्द सुचवणार आहे. यात तुम्ही फक्त योग्य शब्द निवडला जाऊ शकतो आणि त्यामुळे तुमचे टायपिंगचे श्रम वाचणार आहे. याशिवाय इतरही अनेक चांगले फीचर यामध्ये असणार आहे. सध्या या अँपचे गुगल प्ले वर रजिस्ट्रेशन सुरु आहे. गुगल एलो नावाने गुगल प्लेवर सर्च करून या अँपचे रजिस्ट्रेशन करता येते.

वेबदुनिया वर वाचा