स्मार्टफोनवर करा एम एस ऑफिसचा मोफत वापर

सोमवार, 10 नोव्हेंबर 2014 (14:14 IST)
मायक्रोसॉफ्ट कंपनीने मोबाइल युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आणली आहे. आय फोन, आय पॅड आणि अँण्ड्रॉईड मोबाइलधारक मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या डॉक्युमेंटचा वापर आपल्या मोबाइलमध्येच मोफत करू शकतात. कारण आता मायक्रोसॉफ्टने आपले मायक्रोसॉफ्ट ऑफिस हे अँप मोबाइल यूजर्ससाठी मोफत केले आहे. या अँपच्या माध्यमातून मोबाइल युजर्स आय पॅड, आय फोन आणि अँण्ड्रॉईड फोनवर मायक्रोसॉफ्ट ऑफिसचे डॉक्युमेंटस् एडिट आणि क्रिएट करू शकणार आहेत. आपल्या कंपनीच्या उत्पादनांचे युजर्स वाढवण्यासाठी मायक्रोसॉफ्टने जवळपास 365 मोफत अँप युजर्ससाठी उपलब्ध करून दिले आहे.

यापूर्वी मायक्रोसॉफ्टचे अँप वापरण्यासाठी 70 डॉलर म्हणजेच जवळपास 4 हजार रूपयांपर्यंत रक्कम मोजावी लागत होती. मात्र आता वर्ड, एक्सल, पॉवर पॉईंट यासारखे अनेक अँप मोफत वापरता येणार आहेत. मायक्रोसॉफ्टचे मार्केटिंग विभागाचे उपाध्यक्ष जॉन केस यांनी सांगितले की, मोबाइल युजर्सची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळेच मोयक्रोसॉफ्टलाही असं वाटतं की, त्यांचे युजर्स मोबाइल फोनवर डॉक्युमेंटस् क्रिएट आणि एडिट करू शकतील. याशिवाय कंपनीचे सीईओ सत्या नाडेला कंपनीचे युजर्स वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या दिशेनेच त्यांचे हे नवे पाऊल आहे.

वेबदुनिया मराठी मोबाइल ऐप आता iTunes वर देखील, डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. एंड्रॉयड मोबाइल ऐप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. संपूर्ण साहित्य वाचण्यासाठी व तुमच्या सल्लासाठी आमच्या फेसबुक आणि ट्विटर पानावर फ़ॉलो करू शकता.

वेबदुनिया वर वाचा