सिरी विरुद्ध आता गुगल असिस्टेंट (आर्टिफिशिय इटेलिजेंस)

शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2016 (11:09 IST)
गुगल आता नवीन पद्धतीने अॅपलच्या विरोधात उभे राहिले असून गुगलने नवीन सम,स्मार्ट फोन सोबत नवीन गुगल असिस्टेंट (आर्टिफिशिय इटेलिजेंस) बाजारात दाखल केले आहे.
 
गुगल असिस्टेंटचा वापर करण्यासाठी यूजर्सला होम बजेटवर क्लिक करुन होल्ड करावं लागेल. त्यानंतर  “hot word,” ‘jumps into action’ बोलल्यानंतर असिस्टेंट ऑन होईल. कंपनीनं याचा डेमो देखील दाखवला आहे.
असिस्टेंट एखाद्या खास वेळी किंवा जागी काढलेला फोटो तुमच्या कमांडनुसार तात्काळ उपलब्ध आहे. व्हॉईस कमांडनं हे असिस्टेंट मोबइल वापरकर्त्यांना रेस्टॉरंट देखील बूक करेल.
 
अॅपल आपल्या स्मार्टफोनमध्ये आर्टिफिशियल इटेंलिजेंस) सिरी  देत होतं. पण आता गुगलनं पहिल्यांदाच आपल्या डिव्हाइसमध्ये गुगल असिस्टेंट दिलं आहे. गुगल असिस्टेंट वापरण्यास सोपं असून ते अॅपलच्या सिरीला जोरदार टक्कर देऊ शकतं.
 
गुगलचा दावा आहे की, त्यांच्या पिक्सल स्मार्टफोनचा कॅमेरा सर्वात बेस्ट आहे. तसंच यामध्ये फास्ट चार्जिंगचीही सुविधा देण्यात आली आहे. गुगलचं म्हणणं आहे की, त्यांचा पिक्सल स्मार्टफोन 15 मिनिटं चार्ज केल्यानंतर 7 तासापर्यंत बॅटरी लाइफ देतो आहे. त्यामुळे आता अॅपलच्या विरोधात हे युद्ध कसे पूर्ण होते आणि ग्राहक कसे याकडे पाहता हे बघावे लागणार आहे.

वेबदुनिया वर वाचा