व्हॉट्स अँपद्वारे करा पैसे ट्रान्स्फर

सोमवार, 11 मे 2015 (12:42 IST)
तुम्ही आता व्हॉट्स अँपच्या माध्यमातून हव्या त्या ठिकाणी पैसे ट्रान्स्फर करू शकणार आहात. खासगी क्षेत्रात तिसर्‍या क्रमांकावर असलेल्या अँक्सिस या बँकेने ही सुविधा उपलब्ध केली आहे. फेसबुक, ईमेल लिस्ट, टि्वटर, व्हॉट्स अँप या सोशल मीडिया चॅनेलद्वारे तुम्हाला पैसे पाठवता येणार आहेत. पिंग पे ही अँक्सिसने सुरू केलेली नवी सुविधा आहे.
 
अँक्सिसची ही सुविधा एचडीएफसीच्या चिल्लर आणि आयसीआयसीआय बँकेच्या पॉकेटशी स्पर्धा करणारी असणार आहे. मात्र या दोन्ही सुविधांपेक्षा पिंग पेने तुम्ही अधिक जलदगतीने पैसे ट्रान्स्फर करू शकता. इतर सुविधांद्वारे पैसे ट्रान्स्फर करण्यासाठी 30 मिनिटे लागतात. मात्र यापेक्षा कमी वेळात तुम्ही पे पिंगद्वारे पैसे ट्रान्स्फर करू शकता असा दावा अँक्सिस बँकेचे अधिकारी राजीव आनंद यांनी केला आहे. तसेच याद्वारे तुम्ही दिवसाला 50 हजारांपर्यंतची रक्कम ट्रान्स्फर करू शकता.
 
पिंग पे वापरणार्‍यांनी आपल्या मोबाइल क्रमांकाची बँकेकडे नोंदणी करणे गरजेचे आहे. त्यानंतर कोणत्या सोशलअँपद्वारे तुम्हाला पैसे पाठवायचे आहेत याची निवड करावी तसेच ज्या व्यक्तीला पाठवत आहोत त्याचीही निवड करावी. त्यानंतर पाठवण्यात येणारी रक्कम टाकावी. यामुळे सीक्रेट कोड सेट होईल. हा कोड पैसे घेणार्‍यालाही मिळेल. त्यानंतर सेंड या बटणावर क्लिक केल्यास तुमचे पैसे ट्रान्स्फर होतील.

वेबदुनिया वर वाचा