व्हॉटस्अ‍ॅपसाठी मोजावे लागणार पैसे

बुधवार, 1 जुलै 2015 (11:09 IST)
इंटरनेटमधून व्हॉईस आणि मेसेजिंगची सेवा देणाºया व्हॉटस्अ‍ॅपचा समावेश इंडियन टेलिग्राफ अ‍ॅक्टमध्ये करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. असे झाल्यास परवाना शुल्क आकाराले जाणार असल्याने व्हॉटस्अ‍ॅपसाठी मोबाईलधारकांना अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत.

व्हॉटस्अ‍ॅपकडून परवाना शुल्क आकारण्याचा प्रस्ताव दूरसंचार विभागाच्या अंतर्गत समितीने तयार केला आहे. या प्रस्तावावर जर मंजुरीची मोहोर उमटली तर व्हॉटस्अ‍ॅप स्काईप आणि अशा इत सेवांनाही परवाना शुल्क भरावे लागेल आणि त्यामुळे सेवामूल्यात वाढ होऊन ही रक्कम मोबाईलधारकांना द्यावी लागणार आहे.

वेबदुनिया वर वाचा