मायक्रोसॉफ्ट करणार 7,800 कर्मचार्‍यांची कपात

शनिवार, 11 जुलै 2015 (10:20 IST)
सुमारे 7,800 कर्मचार्‍यांना मायक्रोसॉफ्ट कामावरुन काढून टाकणार असल्याचे मायक्रोसॉफ्टचे मुख्याधिकारी सत्या नडेला यांनी सांगितले. मायक्रोसॉफ्टच्या फोन उद्योगात असणार्‍या कर्मचार्‍यांना काढून टाकण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
 
एकूण 1,18,600 कर्मचारी मायक्रोसॉफ्टमध्ये आहेत त्यापैकी 60,000 जण अमेरिकेत काम करतात. या आधी, नोकियाला मायक्रोसॉफ्टने सामावून घेतल्यानंतर सुमारे 18,000 जणांना काढून टाकण्यात येईल असे सांगण्यात आले होते. त्या तुलनेत केवळ निम्म्या कर्मचार्‍यांना काढून टाकण्यात येणार आहे. कर्मचारी काढल्यानंतरही मायक्रोसॉफ्ट स्मार्टफोन निर्मितीमध्ये राहणार आहे.
 

वेबदुनिया वर वाचा