फ्लिपकार्टने 10 तासांमध्ये नोंदविला विक्रम

मंगळवार, 7 ऑक्टोबर 2014 (10:43 IST)
ई-कॉमर्स क्षेत्रातील 'फ्लिपकार्ट' आणि 'स्नॅपडील' या दोन कंपन्यांनी सोमवारी विक्रीचा विक्रम नोंदविला. दोन्ही कंपन्यांच्या वेबसाइटवरून सोमवारी अयघ्या 10 तासांत ६००-६०० कोटीं पेक्षाही जास्त रुपयांच्या वस्तू विकल्या गेल्या. दोन्ही कंपन्यांनी विशेष ऑफर दिल्या होत्या. ऑफर सुरू होताच काही तासांत 'फ्लिपकार्ट'ची वेबसाइट क्रॅश झाली. कारण दर सेकंदाला किमान दहा उत्पादने विकल्याचा दावा स्नॅपडीलने केला आहे. तर फ्लिपकार्टने 60 टक्के ते 90 टक्क्यांपर्यंत सूट दिली होती. 
 
दरम्यान, विश्वविक्रम चीनच्या अलिबाबाच्या नावे 'अलिबाबा' या ई-कॉमर्स कंपनीने 2013 मध्ये सुमारे 3500 कोटींचे उत्पादन विकले होते. 

वेबदुनिया वर वाचा