फेसबुकवर मिळणार चोरी झालेले पासवर्ड!

गुरूवार, 30 ऑक्टोबर 2014 (12:43 IST)
सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकने युझर्सना आणखी सुरक्षितता देण्याचे ठरवले आहे. तुमचा युझर नेम, पासवर्ड जर फेसबुकशिवाय अन्यत्र कोणत्या वेबसाईट्सवर वापरला जात असेल, तर त्याचा अलर्ट फेसबुकवर मिळणार आहे. युझर्सचं फेसबुक अकाऊंट सुरक्षित रहावं यासाठी स्वयंचलित सेवा विकसित केली आहे. यानुसार हॅक केलेले ई-मेल, पासवर्ड वेबच्या सहाय्याने शोधता येणार आहेत. ही सेवा युझर्सच्या माहितीसंदर्भात चौकशी करून त्याचा शोध घेईल. हॅक झालेल्या पासवर्ड, ई-मेलबाबत काही माहिती समजली, त्यावरून एका प्रोग्रामद्वारे ते ट्रेस होईल. त्यानंतर फेसबुकची स्वयंचिलत प्रणाली फेसबुक डेटाबेसच्या आधारे त्याचा शोध लावेल आणि त्याचा अलर्ट तुमच्या फेसबुक अकाऊंटला मिळेल. म्हणजेच कोणता ई-मेल, पासवर्ड हा फेसबुक लॉग इनवरून मेल हॅक होतो हे कळेल.

वेबदुनिया वर वाचा