फेसबुकची सेवा 45 मिनिटे ठप्प

बुधवार, 28 जानेवारी 2015 (10:50 IST)
सोशल नेटवर्किगसाठी प्रसिद्ध असलेले फेसबुकची सेवा मंगळवारी दुपारी 12.45 मिनिटांनी तासाभरानंतर पूर्ववत झाली आहे.
 
फेसबुकचा सर्व्हर सकाळी पावणेबाराच्या सुमारास बंद पडला होता. यामुळे अमेरिका व आशिया खंडामध्ये फेसबुकची सेवा ठप्प झाली होती. फेसबुकची सेवा बंद झाल्याची चर्चा व्हॉट्सअँप व ट्विटरवर नेटिझन्स करत होते. एक तासानंतर ही सेवा पूर्ववत झाली. या काळामध्ये ‘इन्स्टाग्राम’ची सेवा सुद्धा बंद होती. दरम्यान, 9 जून 2014 रोजी फेसबुकला अशा प्रकारे व्यत्यय आला होता. 

वेबदुनिया वर वाचा