पाहा फेसबुकचं हेडक्वॉर्टर

शुक्रवार, 18 सप्टेंबर 2015 (11:14 IST)
फेसबुक आणि त्याबाबत प्रत्येक गोष्टीबाबत आजही प्रत्येकालाच भलतीच ओढ आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन कायमच काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न फेसबुक करीत असतं. आता लवकरच एक नवं फीचर फेसबुक घेऊन येणार आहे. त्यासाठीच आज फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग आपल्या कंपनीचा लाईव्ह व्हिडिओ अपलोड केला आहे. झुकेरबर्गने नव्या ‘लाईव्ह व्हिडिओ’ फंक्शनचा वापर करुन फेसबुकचं कॅलिफोर्नियातील नवं हेडक्वॉर्टर दाखवलं आहे. झुकेरबर्गने यूजर्ससाठी कंपनीच्या नव्या हेडक्वॉर्टरची खास झलक दाखवली आहे. 31 वर्षीय झुकेरबर्ग 27 सप्टेंबरला यूजर्सशी संवाद साधणार आहे. ज्यामध्ये आपण फेसबुकशी निगडित प्रश्न झुकेरबर्गला विचारु शकता. या वर्षाच्या सुरुवातीला फेसबुकचं नवं हेडक्वॉर्टर कॅलिफोर्नियामध्ये सुरु करण्यात आलं. 40,000 स्क्वेअर फीटच्या क्षेत्रात फेसबुकचं ऑफिस आहे.

वेबदुनिया वर वाचा