नेलस्नॅप -नखांवर मनपसंत चित्र काढणारे अँप

सोमवार, 24 मार्च 2014 (17:46 IST)
नखांवर वेगवेगळ्या रंगांची नेलपॉलिश लावायची फॅशन आता इतिहासजमा होऊ लागली असून नखांवर विविध चित्रे रेखाटण्याची फॅशन सध्या जोरात आहे. हॉलिवूड मध्ये तर तशी क्रेझच आली आहे. पण त्यासाठी पार्लरमध्ये जाऊन वेळ घालवावा लागतो आणि टिच्चून पैसेही मोजावे लागतात. मात्र आता घरबसल्याच नखांवर आपल्या पसंतीची चित्रे काढता येणारे अँप तयार करण्यात आले आहे. 47000 डॉलर्स जमवून डिझायनर एंजल अँडरसन आणि सारा हिरिंग यांनी हे अँप विकसित केले आहे. पुढील वर्षात ते बाजारात येईल.
 
हे अँप वापरण्यासाठी प्रथम आपल्या नखांचा फोटो टाकावा लागणार आहे. त्यानंतर इंस्टाग्रामवर येणार्‍या चित्रांतील कोणतीही चित्रे पसंत केली की हे अँप त्यावरून स्टीकर स्वरूपात नेल आर्ट तयार करेल. नेलस्नॅप असे या अँपचे नामकरण केले गेले आहे. हे अँप नखांच्या आकारानुसारच स्टीकर तयार करणार असल्याने त्याची पिंट्र काढून ही स्टीकर्स नखांवर लावता येणार आहेत. ही स्टीकर्स 1 आठवडय़ापर्यंत नखांवर राहू शकणार आहेत.

वेबदुनिया वर वाचा