नऊ वर्षाच्या मुलीने अँपलसाठी डेव्हलप केले अँप

भारतीय वंशाची ऑस्ट्रेलियन मुलगी अन्विता विजय हिने वयाच्या नवव्या वर्षीच आयफोन व आयपॅडसाठी अँप विकसित केले असून अँपल डेव्हलपरच्या 2016 च्या संमेलनात सर्वात कमी वयाची अँप डेव्हलपर होण्याचा बहुमान पटकावला आहे. या संमेलनात अँपलचे सीईओ टीम कुक यांची भेट घेण्याची तिची इच्छा असून टीमशी भेट हे माझे स्वप्न असल्याचे तिने सांगितले.
 
अन्विताने मुलांना शिकविणारे स्मार्टकिस एनिमल्स हे अँप डेव्हलप केले असून त्यात 100 विविध प्राण्यांची नांवे व बोली भाषा शिकता येतात. तसेच रंगाविषयीची माहिती देणारे एक अँपही तिने विकसित केले आहे व सध्या ती आणखीही एक अँप विकसित करत आहे. त्याविषयीची माहिती मात्र जाहीर केली गेलेली नाही. अँपलच्या स्कॉलरशीप कार्यक्रमात अन्विता या संमेलनात सहभागी होत आहे.

वेबदुनिया वर वाचा