कोहली ट्विटरवरही विराट, 50 लाख फॉलोअर्स

शनिवार, 3 जानेवारी 2015 (12:37 IST)
क्रिकेटविश्वात चाहत्यांचे केंद्र बनलेला विराट कोहली ट्विटरवरही विराट ठरला असून त्याच्या चाहत्यांनी 50 लाखांचा आकडा गाठला आहे. कसोटी संघाचा कर्णधार म्हणून घोषणा झाल्यानंतर विराटच्या लोकप्रियतेमध्ये भर पडत आहे.
 
ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात विराट कर्णधार म्हणून भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. 
 
त्याच्याकडून मोठय़ा अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहेत. तिसर्‍या कसोटी सामन्यानंतर धोनीने कसोटी सामन्यातून आपली निवृत्ती जाहीर केली आहे. आयसीसीच्या सर्व प्रमुख स्पर्धाचे विजेतेपद स्वत:च्या नेतृत्वाखाली भारताला मिळवून देणारा कर्णधार म्हणून धोनीचे नाव नोंदले गेले. दरम्यान विराट कोहलीच्या चाहत्यांमध्ये वाढ होत असून टिटरवरील त्याच्या फॉलोअर्सनी 50 लाखांचा आकडा गाठला आहे. 
 
याबद्दल टिटरद्वारेच प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की वा, 50 लाखांचा हा जलद प्रवास आहे. 
 
नव्या वर्षाची ही जबरदस्त सुरुवात आहे. तसेच त्याने चाहत्यांनी हे शक्य केल्याबद्दल आभार मानले आहेत.

वेबदुनिया वर वाचा