किशोरवीन मुलांना मेसेंजर अँपची ‘किक’!

बुधवार, 3 डिसेंबर 2014 (09:58 IST)
फेसबुक, ऑर्कुटचे नाङ्कोनिशाण मिटवून सध्या हॉट्सअँप हे स्मार्टफोनवरील सर्वाधिक लोकप्रिय अँप्लिकेशन ठरत आहे, मात्र मोबाइलमध्ये नवनवीन अँप्स डाऊनलोड करून आपण इतरांपेक्षा किती वेगळे आहोत, सरस आहोत, असा तोरा मिरवणार्‍या किशोरवीन मुलांत सध्या चर्चा आहे, ती किक या मेसेंजर अँपची. आतापर्यंत जगभरात 18 कोटी 5 लाख किक मेसेंजर अँप डाऊनलोड करण्यात आले आहेत. यातून कंपनीने 38.3 कोटी डॉलर उभे केले आहेत. मात्र कोणतेही अँप डाऊनलोड करण्यापूर्वी त्याची विश्वासार्हता तपासून पाहणे गरजेचे असल्याचे मत या क्षेत्रातील अभ्यासकांचे आहे.
 
टोरंटोस्थित किक मेसेंजर या अँपची सुरुवात 2009 मध्ये झाली. चॅट व कंटेंट ही या अँपची ठळक वैशिष्टय़े आहेत. विशेष म्हणजे या अँपमध्ये लहान मुलांसोबत गप्पा मारण्यासाठी यंत्रमानव (रोबो) तयार करण्यात आले आहेत. या अँपने किशोरवीन मुलांना आकर्षित केल्याने व्ही चॅट ऑफ द वेस्ट अशी ओळख त्याला मिळाली आहे. किक अँपला 51 रुपये ते 1500 रुपयांपर्यंत मोजावे लागतात. तरीदेखील हे अँप किशोरवीन मुलांत लोकप्रिय ठरत आहे. त्यामुळे इतर कंपन्यांचा भुवा उंचावल्या आहेत. किक मेसेंजर अँपसाठी नोंदणी करताना कोणत्याही प्रकारचे व्हेरिफिकेशन केले जात नाही. यामुळे कोणतीही व्यक्ती यावर नोंदणी करू शकते आणि हे अँप असलेल्या कोणत्याही व्यक्तीला संदेश पाठवू शकते. तसेच या व्यक्तीची माहितीही मिळवू शकते. त्यामुळे अगदी कमी वेळात हे अँप किशोरवीन मुलांत लोकप्रिय होत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. मात्र किशोरवीन मुलांत लोकप्रिय झालेल्या या अँप्सला कोणत्याच प्रकारचे सुरक्षाकवच नाही. हे अँप सर्वात असुरक्षित असल्याचे नुकतेच निदर्शनास आले आहे. या अँपमध्ये येणारी माहिती कशी आणि कुठून येते, याचा ठावठिकाणा कुणालाच नसल्याने यातून मुलांना धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र किक कंपनीचे मुख्य कार्यकारी संस्थापक टेंड लिव्हिंगस्टन यांनी येणार्‍या काळात फेसबुक व व्हॉट्सअँपला मागे टाकू, असा विश्वास व्यक्त केला आहे. 

वेबदुनिया वर वाचा