आता सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरवर आपण इंटरनेट नसले तरी री-ट्विट करू शकता. ट्विटरचे नवीन राउंड टीम एक असे टूल आहे, जे यूजर ऑनलाईन नसल्यावरही अकाउंटने री-ट्विट करतो. यूजरला कोणत्या ट्विटला री-ट्विट करायचे आहे याचा निर्णय यूजरचा आहे. या टूलचा सर्वात मोठा फायदा म्हणजे इंटरनेटची गरज नाही.
कोणत्याही हॅशटॅगमध्ये येणार्या ट्विटला री-ट्विट करण्यासाठी हॅशटॅगही सबमिट करू शकता. प्रत्येक तासाला एखाद्या विशेष कीवर्ड किंवा ट्विटर अकाउंटच्या किती ट्विटला री-ट्विट करायचे हे ठरवू शकता. यासाठी कोणत्याही यूजरचा हँडल किंवा हॅशटॅग सामील करा. मग उघडलेल्या बॉक्समध्ये ठरवून घ्या की त्या हॅशटॅग किंवा ट्विटरच्या अकाउंटचे किती ट्विट एका तासात री-ट्विट करायचे आहे.