अँपलमधील प्रत्येक तिसरा इंजिनियर भारतीय

शुक्रवार, 8 ऑगस्ट 2014 (17:25 IST)
अमेरिकन टेक्नॉलॉजी कंपनी ‘अँपल’चे आयफोन संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत. 171 अब्ज डॉलर्सची उलाढाल असलेल्या या विशाल कंपनीतील एक तृतीयांश इंजिनियर भारतीय आहेत हे विशेष! या कंपनीला सॉफ्टवेअर, सर्व्हिस आणि सपोर्ट करणार्‍या भारतीय कंपन्यांची संख्याही वाढतच चालली आहे. अनेक भारतीय आटी वेंडर कंपन ‘अँपल’ बरोबरं काम करीत आहेत.
 
कंपनीने 2010 पासून एच-1बी व्हिसासाठी 1,750 अँप्लिकेशन्स दाखल केले होते. मात्र 2011 ते 2013 या काळात त्यांच्या संख्येत अधिक वाढ झाली. त्या काळात हा आकडा 2800 पर्यंत जाऊन पोहोचला.
 
अमेरिकेतील एचएफएस रिसर्चने ही आकडेवारी गोळा केली आहे. ‘एच-1 बी’ व्हिसा घेणार्‍यांमध्ये सर्वाधिक लोक भारतीय आहेत. याचा अर्थ कंपनी भारतीय इंजिनियर लोकांवर अधिकाधिक अवलंबून राहत आहेत. रिसर्च फर्मचे मुख्य अनॅलिस्ट पारीक जन यांनी सांगितले की, अँपलच्या इंजिनियर मंडळीमध्ये एकतृतीयांश लोक भारतीयच आहेत. ते एक तर एच-1 बी व्हिसावर आहेत किंवा ग्रीन कार्ड होल्डर आहेत.

वेबदुनिया वर वाचा