त्याने आयपीएल 2015 मध्ये पंजाब किंग्जविरुद्धच्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली होती, या सामन्यात त्याने केवळ 15 धावा देऊन 4 विकेट घेतल्या होत्या. यानंतर, 2022 मध्ये, त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध 20 धावांत 4 बळी घेतले, ही त्याची दुसरी सर्वोत्तम कामगिरी आहे. 33 धावांत 4 बळी घेत मुंबईविरुद्ध तिसरी सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. यापूर्वी 2012 मध्ये पाकिस्तानविरुद्ध त्याने 11 धावा देत विकेट्स घेतल्या होत्या, ही त्याची चौथी सर्वोत्तम कामगिरी आहे.
वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क मुंबईविरुद्ध आयपीएलमध्ये सर्वोत्तम गोलंदाजी करणारा केकेआरचा तिसरा गोलंदाज ठरला आहे. स्टार्कने 33 धावांत चार बळी घेतले. मुंबईविरुद्ध केकेआरकडून चार विकेट घेणारा स्टार्क तिसरा गोलंदाज ठरला आहे. आंद्रे रसेलने 2021 मध्ये मुंबईविरुद्ध 15 धावांत पाच बळी घेतले होते, ही या संघाविरुद्ध कोणत्याही KKR गोलंदाजाची सर्वोत्तम कामगिरी आहे. सुनील नरेनने 2012 आणि 2014 मध्ये मुंबईविरुद्ध दोनदा प्रत्येकी चार विकेट घेतल्या आहेत. आता या यादीत स्टार्कही सामील झाला आहे.