धोनी व्यतिरिक्त चेन्नईसाठी अजिंक्य रहाणेने 24 चेंडूत 36 धावा, रवींद्र जडेजाने 40 चेंडूत 57 धावा आणि मोईनने 20 चेंडूत 30 धावा केल्या. लखनौकडून कृणाल पांड्याने दोन बळी घेतले. प्रत्युत्तरात लखनौने १९ षटकांत दोन गडी गमावून लक्ष्य गाठले. डी कॉकने 43 चेंडूत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 54 धावांची खेळी केली.
त्याचवेळी कर्णधार केएल राहुलने 53 चेंडूंत नऊ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 82 धावा केल्या. निकोलस पूरन 12 चेंडूत 23 धावा करून नाबाद राहिला आणि मार्कस स्टॉइनिस सात चेंडूत आठ धावा करून नाबाद राहिला. CSK संघ गुणतालिकेत तिसऱ्या आणि लखनौचा संघ पाचव्या स्थानावर आहे. दोघांचे प्रत्येकी आठ गुण आहेत. लखनौचा पुढील सामना चेपॉकमध्ये चेन्नईविरुद्ध होणार आहे. हा सामना 23 एप्रिल रोजी होणार आहे.