DC vs RR :दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा 20 धावांनी पराभव केला

मंगळवार, 7 मे 2024 (23:50 IST)
आयपीएल 2024 च्या 56 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा 20 धावांनी पराभव केला. दिल्ली संघाने नाणेफेक हरून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 गडी गमावून 221 धावा केल्या. अभिषेक पोरेलने सर्वाधिक 65धावांची खेळी खेळली. प्रत्युत्तरात राजस्थान संघाला 20 षटकांत 8 गडी गमावून 201 धावाच करता आल्या
 
राजस्थान संघाचा हा सलग दुसरा पराभव आहे. यापूर्वी सनरायझर्स हैदराबादने त्यांचा एका धावेने पराभव केला होता. त्याचबरोबर दिल्लीचा 12 सामन्यांमधला हा सहावा विजय ठरला. त्याचे 12 गुण आहेत. संघ सहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. 

राजस्थान संघाला प्लेऑफसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्याचे 16 गुण आहेत. दिल्लीचा पुढील सामना 12 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध चिन्नास्वामी येथे होणार आहे.तर राजस्थान रॉयलचा संघ 12 मे रोजी चेपॉक मध्ये चैन्नई सुपर किंग्जशी भिडणार आहे. 

या सामन्यात सॅमसनचा पंचांशी वाद झाला. शाई होपने त्याचा झेल घेतला. तिसऱ्या पंचाने तपासून सॅमसनला झेलबाद घोषित केले. मात्र, व्हिडिओ रिप्ले पाहिल्यानंतर चेंडू सीमा दोरीला स्पर्श करत असल्याचे दिसून आले. सॅमसनचाही यावर विश्वास बसला नाही आणि त्याने पंचाशी वाद घातला.
 
Edited By- Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती