आयपीएलच्या 17व्या हंगामाला सुरुवात होण्यासाठी आता फक्त एक दिवस उरला आहे. शुक्रवारी पहिल्या सामन्यात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB)शी होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी पूर्ण तयारी केली आहे. CSK आणि RCB यांच्या संघात अनुभवी खेळाडू आहेत आणि दोघांकडेही परदेशी खेळाडूंचा चांगला समूह आहे. दोन्ही संघांना या हंगामाची सुरुवात विजयाने करायची आहे, त्यामुळे धोनी आणि आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिस प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी देतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
आयपीएलच्या इतिहासात सीएसके आणि आरसीबी यांच्यात आतापर्यंत एकूण 31 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये गतविजेत्या सीएसकेने 20 सामने जिंकले आहेत, तर आरसीबी संघ केवळ 10 सामने जिंकू शकला आहे.गेल्या हंगामात दोन्ही संघांमध्ये फक्त एकच सामना खेळला गेला होता आणि या सामन्यात सीएसकेने आरसीबीचा आठ धावांनी पराभव केला होता.
या मोसमातील पहिला सामना त्याच्या घरच्या मैदानावर एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळणार आहे.
सीएसके आणि आरसीबीची संभाव्य प्लेइंग इलेव्हन पुढीलप्रमाणे
चेन्नई सुपर किंग्ज: रचिन रवींद्र, रुतुराज गायकवाड (कर्णधार), अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, डॅरिल मिशेल, महेंद्रसिंग धोनी मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, मुस्तफिजुर रहमान.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: विराट कोहली, फाफ डुप्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, सुयश प्रभुदेसाई, दिनेश कार्तिक, कॅमेरॉन ग्रीन, महिपाल लोमरोर, रीस टोपले, मोहम्मद सिराज, करण शर्मा.