नव्या स्वरूपात अवतरलेला सनयझर्स हैदराबाद संघ आणि पुणे वारियर्स दरम्यान आज लढत होत आहे.सनरायडर्स पूर्वीचे नाव डेक्कन चार्जर्स असे होते.
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटीत पदार्पणात सर्वाधिक वेगवान शतक ठोकणा-या शिखर धवनची अनुपस्थिती हैदराबाद संघाला जाणवणार आहे. धवन हाताच्या दुखापतीतून अजून सावरलेला नाही. संघाचे नेतृत्व कुमार संगकाराकडे आहे. माजी कसोटीपटू के. श्रीकांत आणि व्हीव्हीएस लक्ष्मण संघाचे मार्गदर्शक, ऑस्ट्रेलियाचा टॉम मुडी मुख्य कोच तर पाकचा वकार युनूस बोलिंग कोच आहे. फलंदाजीचा भार संगकारा, द. आफ्रिकेचा जे.पी.डुमिनी, श्रीलंकेचा थिसारा परेरा, ऑस्ट्रेलियाचा कॅमेरॉन व्हाईट आणि पार्थिव पटेल सांभाळतील.इशांत शर्मा, लेगस्पीनर अमित मिश्रा, नाथान मॅक्युलम हे गोलंदाज आहेत. पुणे वॉरियर्सचे नेतृत्व श्रीलंकेच्या अॅन्जेलो मॅथ्यूजकडे आहे. ऑस्ट्रेलियाचा मायकेल क्लार्क मूळ कप्तान होता परंतु तो जखमी असल्याने त्याने स्पर्धेतून माघार घेतली आहे. युवराजसिंगसारखा स्फोटक फलंदाज या संघात आहे.अजंता मेंडीस, रॉस टेलर, अभिषेक नायरमुळे संघ मजबूत बनला आहे. जम्मू आणि काश्मीरचा अष्टपैलू परवेज रसूल पहिल्यांदाच आयपीएल स्पर्धेत खेळत आहे. नायरसाठी ६ लाख ७५ डॉलर्स मोजण्यात आले आहेत.