थरारक सामन्यात बेंगळुरूची सरशी

WD
ख्रिस गेलच्या झंझावती नाबाद 92 धावा, तसेच शेवटच्या षटकात विनय कुमारने केलेल्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने येथील चित्रास्वामी स्ट‍ेडियमवर खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या सहाव्या सत्रातील दुसर्‍या सामन्यात मुंबई इंडियन्सला दोन धावांनी पराभूत करून अभियानाची विजयी सुरुवात केली. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 156 धावा केल्या. मुंबई इंडीयन्सचा पाठलाग दोन धावांनी कमी पडला. त्यांच्या 20 षटकांत 154 धावा झाल्या.

बेंगलोर रॉयल चॅलेंर्जसने दिलेल्या 157 धावांच्या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी मुंबई इंडीयन्सकडून जगातील दोन दिग्गज खेळाडूंची जोडी मैदानात उतरली. सचिन तेंडुलकर आणि रिकी पाँटिंग. दोघांनीही डावाची छान सुरवात केली. दोघांचेही ट्युनिंग जमले होते. बघता-बघता संघाचे अर्धशतकी फळय़ावर लागले. फटक्यागणिक दोघांची खेळी बहरत असतानाच सचिन धावचित झाला. त्याने 23 धावा केल्या. सचिननंतर पाँटींग जास्त काळ टिकला नाही. त्यानी 28 धावा केल्या. सतराव्या षटकांत कार्तिकने ख्रिस्टीयनल सलग तीन षटकार आणि नंतर एक चौकार मारला. या षटकांत24 धावा निघाल्याने मुंबईच्या आशा पल्लवित झाल्या. शेवटच्या दोन चेंडूत आठ धावांची गरज असताना केरॉन पोलार्डने पाचव्या चेंडूवर चौकार ठोकून थरार वाढविला, परंतु शेवटच्या चेंडूवर त्याला एकच धाव घेता आली आणि मुंबईला दोन धावांनी पराभव पत्कारावा लागला.

वेबदुनिया वर वाचा