ख्रिस गेलने आपीएलमधील सर्वाधिक जलद शतक व वैयक्तिक सर्वोच्च धावा असे विक्रम केले. त्यामध्ये गेलने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना पुणे वॉरिअर्सविरुध्द 66 चेंडूंत नाबाद 175 धावा केल्या. त्याने कोलकाता नाईट राडर्समध्ये खेळत असलेला ब्रेंडन मॅकुलुम याचा नाबाद 158 धावांचा विक्रम मोडीत काढला. मॅकुलुमने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुध्द चिन्नास्वामी स्टेडियवर 2008 च्या पहिल्या आपीएल स्पर्धेत 73 चेंडूंवर नाबाद 158 धावा काढल्या होत्या. हा विक्रम गेलने मोडीत काढला. याबाबत मॅकला समाधान होत आहे, असे मत मॅकुलुमने येथे व्यक्त केले आहे.