कोलकाता संघाचा एकच कर्णधार

कोलकाता नाइट राइडर्सने आज आपले क्रिकेट व्‍यवस्‍थापक जॉन बुकानन यांच्‍या संघात एकापेक्षा जास्‍त कर्णधार ठेवण्‍याच्‍या निर्णयास रद्द ठरविले आहे. इंडियन प्रीमियर लीगच्‍या दुस-या सत्रात संघाचा केवळ एकच कर्णधार राहिल असे त्‍यांनी जाहीर केले आहे.

टीमच्‍या थिंक टँकने याजागी सौरव गांगुली राहील की नाही हे मात्र स्‍पष्‍ट केलेले नाही. या संदर्भातील निर्णय द.आफ्रिकेत सामने सुरू होण्‍यापूर्वी घेतला जाणार आहे.

वेबदुनिया वर वाचा