सचिनमुळे मुंबई इंडियन्सच्या मनोधैर्यात वाढ

भाषा

मंगळवार, 13 मे 2008 (18:27 IST)
सचिन तेंडुलकरच्या आगमनाने मुंबई इंडियन्सचे मनोधैर्य वाढले असून वानखेडे मैदानावर चेन्नईस पराभूत करून सलग चौथा विजय साकार करण्याबाबत ते आशावादी आहेत. आयपीएल स्पर्धेत गुणतक्त्यात मुंबई सहाव्या स्थानावर आहे.

सचिनला दुखापतीमुळे पहिल्या सात सामन्यात खेळता आले नव्हते. सचिनने संघाची धुरा सांभाळल्याबरोबर अपेक्षा उंचावल्या असून त्याच्यावर संघास सन्मानजनक स्थितीत पोहचवण्याचे आव्हान राहणार आहे. धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईच्या संघाने मालिकेत जबरदस्त कामगिरी केली आहे.

वेबदुनिया वर वाचा