श्रीसंतने मैत्रिणीसाठी खरेदी केला होता ’ ब्लॅकबेरी’

WD
आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंगमधून कमावलेल्या पैशातून श्रीसंतने एका दिवसात सुमारे दोन लाखांची खरेदी केल्याचे समोर आले आहे. त्याने आपल्या मैत्रिणीसाठी ब्लॅकबेरी मोबाईलही खरेदी केला होता. पोलिसांनी श्रीसंतच्या जयपूर येथील एका मैत्रिणीच्या घरातून खरेदी करण्यात आलेले सामान जप्त केले आहे. यामध्ये ब्लॅकबेरी झेड १० आणि १.९५ लाख रूपयांचे कपडे मिळाले आहेत. श्रीसंतने हे सर्व सामान फिक्सिंगमधून मिळालेल्या कमाईतून केल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. सामान जप्त करण्यासाठी श्रीसंतला जयपूर नेण्यात आले होते. आज (मंगळवारी) श्रीसंतचा आवाजाचा नमुनाही घेण्यात आला आहे. त्याच्यावर कलम ४०९ लावण्यात आला आहे. याअंतर्गत त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊ
शकते.

श्रीसंतने काही मोठया क्रिकेटपटूंची नावे घेतली आहेत, ज्यांना बुकीज कायम महागडया भेटवस्तू देत असत. बुकीजने या खेळाडूंना हमर ही महागडी चारचाकी, महागडी घड्याळे त्याचबरोबर मुलीही पुरवल्या आहेत, अशी माहिती श्रीसंतने पोलिसांना दिली असल्याचे सूत्रांकडून समजते. हे खेळाडू स्पॉट फिक्सिंगसाठी तयार व्हावेत म्हणून बुकीज असे करत होते. त्याचबरोबर बुकीजने राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंना शॉपिंग करण्यासही दिली होती. त्याच प्रकरणात सध्या अटकेत असलेला चंदिलाने २.५ लाखांच्या दोन जिन्स पँट आणि महागडे घडयाळ खरेदी केले होते.

मंगळवारी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आणखी तीन लोकांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये हवाला ऑपरेटर अवधेश पटेलकडे १.२८ कोटी रूपयांची रोकड मिळाल्याचे मुंबई पोलिसचे जॉर्इंट कमिशनर हिमांशु रॉय यांनी सांगितले. प्रेम तनेजा आणि वीरेंद्र दारासिंग रंधवा ऊर्फ विंदूला बुकींबरोबरच्या संबंधासाठी अटक करण्यात आली आहे.

वेबदुनिया वर वाचा