विजयी सुरुवातीस केकेआर, दिल्ली आतुर!

WD
इंडियन प्रीमिअर लीगच्या सहाव्या सत्राला आज येथील ईडन गार्डनवर गत विजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्सदरम्यान रात्री 8 वाजता खेळल्या जाणार्‍या सामन्याने सुरुवात होणार आहे. अशात आज विजय मिळवून मागच्या सत्राची लय पुढेही राखण्याचा प्रयत्न केकेआर करेल, तर दिल्लीचा संघही स्पर्धेच्या अभियानाची विजयी सुरुवात करण्यास आतुर असेल.

केकेआरचा संघ घरच्या मैदानावर खेळणार असल्यामुळे त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा असतील. लागोपाठ दोन स‍त्राचे विजेतेपद पटकावणारा दुसराच संघ बनण्याचा प्रयत्न केकेआर करणार आहे. यापूर्वी चेन्नईनेच सलग दोन वेळा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. दिल्लीला अद्यापही या स्पर्धेचे विजेतेपद पटकावता आले नाही. या संघाचा आक्रम सलामीवीर सेहवाग पहिल्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे, तर इंग्लंडचा स्टार फलंदाज केविन पीटरसनही गुडघ्याच्या दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेत खेळण्याची शक्यता नसल्याने या दोघांची अनुपस्थिती कर्णधार जयवर्धनेला जाणवेल.

वेबदुनिया वर वाचा