भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार बनण्याचे आपले स्वप्न अपूर्णच राहीले असून आपण संघाचा कर्णधार बनण्यास इच्छूक असल्याची प्रांजळ कुबली युवराजसिंगने एका टीव्ही चॅनेलला दिलल्या मुलाखतीत सांगितले.
सध्याचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि माझ्यात कोणत्याही प्रकारचा वाद नसून आम्ही दोघे चांगले मित्र असल्याचेही त्याने सांगितले. आमच्याबद्दल प्रसार माध्यमांनी उठविलेल्या अफवा खोट्या असून त्यामध्ये काहीही तथ्य नाही.
आपल्या वयैक्तीक इच्छेपेक्षा संघ हित महत्त्वाचे आहे. धोनीला खेळाडूंचे समर्थन असून आमच्यात सहकार्याची भावना आहे. तो अत्यंत शांत असून कर्णधार पदासाठी शांतचित्त राहणे अत्यंत आवश्यक आहे.
माझ्या करिअरशी तुलना केली तर तो माझ्यानंतर 3-4 वर्षाने क्रिक्रेटमध्ये आला आणि कर्णधारही बनला. परंतु, अनुभवाने तो माझ्यापेक्षा नक्कीच कमी आहे.