धोनीने फोडले संघावर पराजयाचे खापर

गोलंदाज आणि फलंदाज या दोघांकडूनही अनेक चुका झाल्याचे कबुल करत राजस्थान रॉयल्स विरोधात झालेल्या आयपीएल अंतिम सामन्यांतील पराभवाचे खापर चेन्नई संघाचा कर्णधार महेंद्र धोनीने संघातील खेळाडूंवर फोडले आहे.

झालेला पराभव आपल्याला मान्य असल्याचेही तो म्हणाला. उपान्त सामन्यानंतर तयारीसाठी किंचीतही वेळ न मिळाल्याची खंतही त्याने व्यक्त केली. सामना जिंकण्यासाठीच आम्ही मैदानात उतरलो होतो. जय-पराजय खेळात चालतातच त्यामुळे पराभवाचे दु:ख नसल्याचे त्याने स्पष्ट केले.

वेबदुनिया वर वाचा