दुसरा क्वॉलिफायर सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर

WD
राहुल द्रविडचा राजस्थान रॉयल्स आणि रोहित शर्माचा मुंबई इंडियन्स, या दोन संघात शुक्रवार 24 मे रोजी येथील ईडन गार्डन्सवर सहाव्या आपीएल क्रिकेट स्पर्धेतील दुसरा क्वॉलिफायर ट्वेंटी-20 सामना खेळला जात आहे.

दुसर्‍या भाषेत सांगावायचे झाल्यास हा दुसरा उपान्त्य सामना आहे. यातील विजेता संघ 26 मे रोजी चेन्नईबरोबर खेळणार आहे. पहिल क्वॉलिफायर सामन्यात चेन्नई संघाने मुंबईचा 48 धावा राखून पराभव केला होता. या सामन्यातील पराभूत संघाला नियमाप्रमाणे पुन्हा खेळण्याची संधी मिळते. त्याप्रमाणे मुंबईला ही संधी मिळाली आहे. पहिल्या इलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सने सनराझर्स हैदराबाद संघाचा 4 गडी राखून पराभव केला. त्यामुळे, हे दोन्ही संघ दुसर्‍या क्वॉलिफायर सामन्यात समोरासमोर आले आहेत.

मुंबईने साखळी गुणत्क्यात 22 गुणांसह दुसरे स्थान मिळविले होते. राजस्थानने 20 गुणांसह तिसरे स्थान घेतले होते. बुधवारी रात्री खेळल्या गेलेल्या सामन्यात राजस्थानच्या गोलंदाज व फलंदाजांनी संतुलित कामगिरी केली आहे. हैदराबाद संघाला कमी धावसंख्येत रोखल्यानंतरही विजयासाठी त्यांना संघर्ष करावा लागला.

राजस्थान संघावर मानसिक दडपण आहे. स्पॉट फिक्सिंगप्रकरणी त्यांच्या संघातील तीन प्रमुख खेळाडूंना अटक झाली. त्यामुळे, हा संघ अडचणीत आला आहे. याउलट, मुंबईचा संघ प्रबळ दिसून येत आहे. तरीही शेवटच्या साखळी सामन्यात पंजाबने मुंबईला 50 धावांनी नमविले. तर चेन्नईकडून हा संघ पराभूत झाला. तरीही कर्णधार रोहित शर्माने आमचा संघ चोकर नाही, असे सांगितले. प्रमुख फलंदाज सचिन तेंडुलकर याच्या हाताला दुखापत झाली आहे. त्यामुळे, त्याच्या खेळणबाबत साशंकता आहे.

मुंबई संघाने 2010 साली स्पर्धेचे उपविजेतेपद घेतले होते. 2011 साली मुंबईने चॅम्पिन्स लीग स्पर्धाही जिंकली होती. परंतु, चेन्नईविरुद्ध खेळताना मुंबई संघ दडपणाखाली खेळला. 17 सामने खेळूनही मुंबई संघात शिस्तबद्ध गोलंदाज नाहीत व त्यांचे संतुलन बिघडलेले आहे. ड्वेन स्मिथ हा फॉर्मात आहे. कार्तिक आणि रोहित शर्मा हे दबावाखाली खेळू शकले नाहीत. पोलार्डही दबावाखाली खेळू शकत नाही, हेच दिसून आले आहे. सहाव्या आयपीएल साखळी सामन्यात 17 एप्रिल रोजी राजस्थानने मुंबईवर 87 धावांनी मात केली होती. तर 15 मे रोजी मुंबईने राजस्थानला 14 धावांनी नमविले होते. त्यामुळे, या दोन्ही संघात तुल्बळ लढत अपेक्षित आहे.

38 वर्र्षाचा व्हिक्टोरियाचा ब्रॉड हॉज हा सर्वात अनुभवी खेळाडू आहे व त्याने ट्वेंटी-20 मध्ये 195 सामन्यात 5,548 धावा केल्या आहेत. त्यानेच राजस्थानला हैदराबादविरुद्ध एकहाती विजय मिळवून दिला. याचा अर्थ राजस्थानकडे कर्णधार द्रविड, अजिंक्य राहणे, शेन वॅटसन, संजू सॅमसन, ब्रॉड हॉज असे एकापेक्षा एक सरस फलंदाज आहेत. मुंबई संघही फलंदाजीत मजबूत आहे.

प्रतिस्पर्धी संघ : राजस्थान रॉल्स- राहुल द्रविड (कर्णधार), अजिंक्य राहणे, अशोक मनेरिया, ब्रॉड हॉग, केवॉन कूपर, सचिन बेबी, स्टुअर्ट बिन्नी, ब्रॉड हॉज, दिशांत याज्ञिक, मिडेल एडवर्डस, हरमित सिंग, जेम्स फॉल्कनेर, कुमार बोरेसा, कुशल जनित परेरा, ओवेश शहा, प्रवीण तांबे, राहुल शुक्ला, सॅमुएल बद्री, संजू सॅमसन, शॉन टेट, श्रीवस्त गोस्वामी, सिध्दार्थ त्रिवेदी, विक्रमजीत मलिक.

मुंबई इंडियन्स- रिकी पोन्टिंग (कर्णधार), अबू नेचीम अहमद, अक्षर पटेल, आदित्यतारे, अंबाटी राडू, अमितोझे सिंग, धवल कुलकुर्णी, दिनेश कार्तिक, ड्वेन स्मिथ, ग्लेन, जेकब ओरम, जलाज सक्सेना, जेम्स फॅकलिन, केरॉन पोलार्ड, लसिथ मलिंगा, मिशेल जॉन्सन, नथन कोल्टेर-निले, फिल ह्युजेस, पवन सुल, प्रगन ओझा, रिशी धवन, सचिन तेंडुलकर, र्सूकुमार यादव, सुशांत मराठे, जुवेंद्रसिंग चहाल, हरभजन सिंग.

वेबदुनिया वर वाचा