'आयपीएलच्या मोहात अडकू नका'

वार्ता

शनिवार, 4 एप्रिल 2009 (12:47 IST)
सोन्याचे अंडे देणार्‍या इंडियन प्रिमियर लीगच्या (आयपीएल) मोहात ऑस्ट्रेलियाच्या इतर खेळाडूनी अडकून पडू नये. उलट दक्षिण आफ्रिका विरूध्द होणार्‍या एकदिवसीय मालिकेवर लक्ष केंद्रीत करावे, असा सल्ला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉटींगने आपल्या सहकार्‍याना दिला.

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ येत्या 17 एप्रिललापासून दक्षिण आफ्रिका विरूध्द पाच एक दिवसीय सामन्याची मालिका खेळणार आहे. त्यानंतर आयपीएलची मालिका सुरू होणार आहे.

संध्या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूना ट्‍वेंटी..20 फिवर झालेल्याचे दिसत असून त्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी पॉटिंगने आपल्या सहकार्‍यांना फुकटचा सल्ला दिला.

वेबदुनिया वर वाचा