IPL 2023 कोलकाताचा नवा कॅप्टन

सोमवार, 27 मार्च 2023 (22:07 IST)
Twitter
Kolkata Knight Riders New captain: दोन वेळचा चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सने नव्या कर्णधाराच्या नावाची घोषणा केली आहे. संघाचा युवा खेळाडू नितीश राणा संघाची धुरा सांभाळणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सनेही त्यांच्या सोशल मीडियावर अधिकृतपणे याची पुष्टी केली आहे. संघाचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यर पाठीच्या दुखण्याने त्रस्त आहे. त्यामुळे अहमदाबाद येथे खेळल्या गेलेल्या घरच्या कसोटी सामन्यात तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध फलंदाजीसाठीही उतरला नाही. पाठदुखीमुळे तो आयपीएलचे पहिले काही सामने खेळू शकणार नाही. पाठदुखीपासून मुक्ती मिळाल्यानंतर तो संघात सामील होणार असून कर्णधारही होताना दिसणार आहे.
 
 नितीश केकेआरचा 7वा कर्णधार असेल

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती