त्यानंतर हैदराबादला 18 चेंडूत 33 धावांची गरज होती. त्यावेळी निकोलस पूरन आणि वॉशिंग्टन सुंदर क्रीजवर होते. या षटकात आवेशने निकोलस पूरन (34) आणि अब्दुल समद (0) यांना सलग दोन चेंडूंवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. आवेशने या षटकात सात धावाही दिल्या. यानंतर हैदराबाद संघाला सावरता आले नाही आणि पराभव पत्करावा लागला.
लखनौ संघाचा हा सलग दुसरा विजय आहे. या संघाने आतापर्यंत एकूण तीन सामने खेळले आहेत. पहिल्या सामन्यात त्यांना गुजरातविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. यानंतर लखनौने पुनरागमन करत चेन्नई आणि हैदराबाद विरुद्ध विजय मिळवला. या विजयासह लखनौचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचबरोबर हैदराबादचा सलग दुसऱ्या सामन्यातील हा दुसरा पराभव आहे. SRH चा संघ गुणतालिकेत शेवटच्या म्हणजे आठव्या क्रमांकावर आहे.