आयपीएल 2022 : आरसीबीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, एबी डिव्हिलियर्स 15 व्या हंगामात फ्रेंचायझीमध्ये सामील

मंगळवार, 8 मार्च 2022 (20:20 IST)
दक्षिण आफ्रिकेचे माजी दिग्गज एबी डिव्हिलियर्स , ज्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, त्याची इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) च्या 15 व्या हंगामासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) चे मेंटॉर  म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते . 
 
वृत्तानुसार, डिव्हिलियर्सने त्यांच्या जुन्या आयपीएल फ्रँचायझीसोबत पुन्हा एकत्र येण्याची इच्छा दाखवली आहे.
माजी क्रिकेटपटू डिव्हिलियर्सने दिल्ली डेअरडेव्हिल्स (आता कॅपिटल्स) सह आयपीएल स्पर्धेची सुरुवात केली. त्यानंतर 2011 मध्ये आरसीबीने त्यांना 5 कोटींमध्ये खरेदी केले. सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेण्यापूर्वी डिव्हिलियर्स 2021 पर्यंत बंगळुरू फ्रँचायझीसाठी खेळले. 
 
डिव्हिलियर्सने 2008 ते 2021 दरम्यान खेळलेल्या 184 सामन्यांमध्ये 39.70 च्या सरासरीने तीन शतके आणि 40 अर्धशतकांच्या मदतीने 5,162 धावा केल्या आहेत. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पाच हजारांहून अधिक धावा करणारे  डिव्हिलियर्स हे सहावे फलंदाज आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आयपीएल 2022 च्या मोहिमेची सुरुवात डी व्हाय पाटील स्टेडियमवर पंजाब किंग्ज (PBKS) विरुद्धच्या सामन्याने करेल.
 
विराट कोहलीच्या राजीनाम्यानंतर बंगळुरू संघ 2013 नंतर प्रथमच दुसऱ्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे.आरसीबी चेन्नई सुपर किंग्ज ( CSK ), सनरायझर्स हैदराबाद ( SRH ), पंजाब किंग्स ( PBKS ) आणि गुजरात टायटन्स ( GT ) यांच्यासह ब गटात आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती