रविवारी होणार्या दुहेरी हेडरच्या पहिल्या सामन्यात वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सची लढत लखनौ सुपर जायंट्सशी होणार आहे. दोन्ही संघ आपला मागील सामना जिंकून या सामन्यात पोहोचले आहेत आणि प्लेऑफसाठी पात्र होण्याची शक्यता वाढवण्याच्या प्रयत्नात हा सामना जिंकण्याच्या इराद्याने ते या सामन्यात उतरतील. लखनौ आणि दिल्लीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये क्वचितच बदल झाला आहे. आयपीएलच्या या हंगामातील पॉइंट टेबलमध्ये दिल्ली कॅपिटल्स सध्या सहाव्या स्थानावर आहे, तर लखनौ सुपर जायंट्स सध्या पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे.
आयपीएलच्या 45व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला त्यांचा अप्रतिम फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आणि स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नर यांच्याकडून मोठ्या आशा आहेत. वॉर्नरने या मोसमात सहा डावांत 52.18 च्या सरासरीने आणि 158.18 च्या स्ट्राईक रेटने 261 धावा केल्या आहेत. त्याला वानखेडेवर फलंदाजी करायला जास्त आवडते आणि त्याने येथे कधीही 25 पेक्षा कमी धावा केल्या नाहीत.
वेगवान गोलंदाज आवेश खानने या मोसमात 11 डावात आठ विकेट्स घेतल्या आहेत. वॉर्नरप्रमाणेच त्याचाही वानखेडेवर उत्कृष्ट विक्रम असून तो येथे कोणत्याही सामन्यात विकेट घेतल्याशिवाय जात नाही. त्याने सहा सामन्यांत 7.56 च्या इकॉनॉमीने 10 बळी घेतले आहेत. कुलदीप यादवने या वर्षात चार वेळा प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा किताब पटकावला आहे. त्याने आठ सामन्यांत 17 बळी घेतले आहेत.
प्लेइंग इलेव्हन
दिल्ली कॅपिटल्स - पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकिपर ), ललित यादव, रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान, चेतन साकारिया
लखनौ सुपर जायंट्स - क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), केएल राहुल (कर्णधार), दीपक हुडा, कुणाल पंड्या, मार्कस स्टॉइनिस, आयुष बडोनी, जेसन होल्डर, दुष्मंथा चमिरा, मोहसीन खान, आवेश खान, रवी बिश्नोई