CSK vs GT:'किलर' मिलर आणि राशिद खान यांच्या झंझावाती खेळीने गुजरात जिंकला, चार वेळा चॅम्पियन चेन्नईचा पाचवा पराभव

सोमवार, 18 एप्रिल 2022 (09:08 IST)
गुजरात संघ उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे आणि त्याने आतापर्यंत सहा पैकी पाच सामने जिंकले आहेत. त्याचवेळी चेन्नईच्या संघाने सहापैकी पाच सामन्यात पराभव पत्करला आहे. गुजरातचा कर्णधार राशिद खानने नाणेफेक जिंकली. त्याने चेन्नईविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 20 षटकांत 169 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातने 19.5 षटकांतच लक्ष्याचा पाठलाग केला.
 
गुजरात टायटन्सने चार वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जचा तीन गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 20 षटकांत 5 गडी गमावून 169 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातने 19.5 षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्याचा पाठलाग केला. 
 
गुजरातसाठी 'किलर मिलर' म्हणून प्रसिद्ध असलेल्या डेव्हिड मिलरने एका टोकाकडून शानदार फलंदाजी करताना तुफानी खेळी खेळली आणि सामना जिंकला. मिलरने 51 चेंडूंत आठ चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने नाबाद 94 धावा केल्या. 
 
या विजयासह गुजरातने सहा सामन्यांतून पाच विजय आणि एक पराभव आणि 10 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखले आहे. त्याचवेळी, चेन्नईचा संघ सहा सामन्यांतून एक विजय आणि पाच पराभवांसह दोन गुणांसह नवव्या स्थानावर आहे. चेन्नईचा पुढील सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती