SRH vs PBKS:हैदराबाद संघ सलग चौथा सामना जिंकण्यासाठी, पंजाबशी टक्कर देणार

रविवार, 17 एप्रिल 2022 (11:39 IST)
शानदार पुनरागमन करणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद रविवारी आयपीएल सामन्यात पंजाब किंग्जविरुद्ध लढत असताना त्यांची तीन सामन्यांची विजयी मालिका कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. हैदराबाद आणि पंजाबच्या संघांना प्लेऑफच्या शर्यतीत स्वतःला पुढे ठेवण्यासाठी दोन महत्त्वाचे गुण मिळवायचे आहेत. आज पंजाबशी टक्कर देणार 
 
पंजाबचा संघ आतापर्यंत लयीत दिसलेला नाही. एका विजयानंतर संघाला पुढच्या सामन्यातच पराभवाला सामोरे जावे लागते. या क्रमवारीत या संघाने पाच सामने खेळले असून तीन जिंकले आहेत. सध्या पंजाबचा संघ गुणतालिकेत अव्वल चार संघांमध्ये सामील आहे. हैदराबादचा संघ सातव्या स्थानावर असला तरी दोन्ही संघांचे गुण समान आहेत. 
 
पंजाबची गोलंदाजी खूप मजबूत आहे. राहुल चहर, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग आणि वैभव अरोरा सुस्थितीत आहेत. कोणत्याही फलंदाजीचा क्रम उद्ध्वस्त करण्याची क्षमता या गोलंदाजांमध्ये आहे. पंजाबच्या गोलंदाजीत कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. 
 
हैदराबादची गोलंदाजी मजबूत असून आतापर्यंत भुवनेश्वर कुमार, मार्को येनसन, टी नटराजन यांनी चांगली कामगिरी केली आहे. उमरान मलिकला महागात पडलंय, पण हळूहळू तोही पकड घेत आहे. याच कारणामुळे हैदराबादचा संघ आता अधिक संतुलित दिसत आहे. हैदराबाद संघात कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. 
 
पंजाबचा संभाव्य संघ
मयंक अग्रवाल (कर्णधार), शिखर धवन, जॉनी बेअरस्टो/भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), ओडियन स्मिथ, शाहरुख खान, कागिसो रबाडा, राहुल चहर, वैभव अरोरा, अर्शदीप सिंग. 
 
हैदराबादसाठी संभाव्य संघ
अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन (विकेटकीपर), एडन मार्कराम, शशांक सिंग, जगदीश सुचित, भुवनेश्वर कुमार, मार्को येन्सन, उमरान मलिक, टी नटराजन. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती