मुंबईसमोर मधल्या फळीतील उणिवा दूर करण्याचे आव्हान

गुरूवार, 29 एप्रिल 2021 (10:46 IST)
विद्यमान चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा संघ गुरूवारी राजस्थान रॉयल्सविरूध्द होणार्या आयपीएलच्या दुपारच्या सत्रातील सामन्यात आपल्या मध्यला फळीतील कमकुवत बाजू दूर सारून विजयी लय प्राप्त करण्याचा प्रयत्न करेल. मुंबईने सलग दोन सामने गावले आहेत. तर संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थानने आतापर्यंत स्पर्धेतील तीन सामने गमावले आहेत. त्यांनी मागील सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सविरूध्द सहा गड्यांनी विजय नोंदविला आहे.
 
त्यांचा प्रयत्न याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा असेल. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा व क्विंरून डिकॉक यांच्याकडून चांगल्या सुरूवातीनंतर मोठ्या खेळीची अपेक्षा आहे, तर मधली फळी ही मुंबईच्या चिंतेचा विषय आहे. त्यामध्ये सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक व कृणाल पांड्या बंधू, कायरन पोलार्ड यांचा समावेश आहे. या सर्वांना म्हणावी तशी खेळी करता आलेली नाही. 
 
गोलंदाजीत वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह यांनी अखेरच्या षटकांमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. लेगस्पिनर राहुल चाहर, कृणाल पांड्या यांनी प्रभावशाली गोलंदाजी केली आहे. पोलार्ड अष्टपैलू कामगिरी बजावत आहे. दुसरीकडे राजस्थानला अनेक गोष्टींमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. त्यांचे मनन व्होरा व यशस्वी जैस्वाल मोठीखेळी करण्यात  अपयशी ठरले आहेत. जोस बटलरला मोठी खेळी खेळावी लागेल तर सॅसनला आपल्या कामगिरीत सातत्य ठेवावे लागेल. शिव दुबे, डेव्हिड मिलेर व रियान पराग यांनाही महत्त्वपूर्ण योगदान द्यावे लागेल. अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरीसला आपली उपयुक्तता सिध्द करण्यासाठी दबाव असेल. वेगवान गोलंदाज चेतन सकारीया, जयदेव उनाडकट व मुस्तफिजूर रेहान यांनी चांगली कामगिरी केली आहे. तर लेगस्पिनर राहुल तेवतिया व श्रेयस गोपाल हे प्रभावी गोलंदाजी करण्यात अपयशी ठरले आहेत. 
 
आजचा सामना 
मुंबई इंडियन्स विरुद्धन राजस्थान  रॉयल्स
स्थळ : अरुण जेटली 
स्टेडियम : नवी दिल्ली 
वेळ : दुपारी 3.30 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती