कोलकाता-मुंबई यांच्यात आज चुरशीच्या लढतीची शक्यता

मंगळवार, 13 एप्रिल 2021 (17:30 IST)
आयपीएलमध्ये आज (मंगळवारी) पाचवेळचा विजेता असलेल्या मुंबई इंडियन्सचा सामना दोनवेळचा चॅम्पियन असलेल्या कोलकाता नाइट रायडर्सशी होणार आहे. संघाचा हा स्पर्धेतील दुसरा सामना असेल.
 
कोलकाताने जिथे आपल्या पहिल्या लढतीत सनरायझर्स हैदराबादचा पराभव केल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. तर मुंबईला शुभारंभाच्या लढतीत रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूकडून पराभव पत्करावा लागल्याने ते विजयाच्या प्रतीक्षेत असतील. एकूणच हा सामना चुरशीचा होण्याची शक्यता आहे.
 
सामन्यापूर्वी मुंबई संघाचे क्रिकेट ऑपरेशन्स संचालक झहीर खान यांनी सोमवारी म्हटले की, आमचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या लवकरच गोलंदाजीतही योगदान देईल. तो एक परिपूर्ण खेळाडूच्या रूपात संघासाठी महत्त्वाचा आहे व ही गोष्ट प्रत्येकाला माहीत आहे. त्याने इंग्लंडविरुध्दच्या मालिकेत गोलंदाजी केली होती. त्याला खाद्याशी निगडित थोडी समस्या आहे. मात्र, हा चिंतेचा विषय नसून तो लवकरच गोलंदाजी करताना दिसेल व गोलंदाजी आणि फलंदाजीने आपले योगदान देईल. याशिवाय कायरन पोलार्डही सहावा गोलंदाज म्हणून मुंबईसाठी पर्याय असेल, असेही तसेच क्विंटन डी कॉक केकेआरविरुध्दच्या लढतीत संघात सामील होईल, असेही ते म्हणाले. त्याच्या समावेशामुळे त्याच्या ख्रिस लिनचे स्थान धोक्यात आले आहे.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती