CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...

गुरूवार, 8 ऑक्टोबर 2020 (11:25 IST)
आयपीएलमध्ये (IPL 2020) चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्याच झालेला सामना CSKने 10 धावांनी गमावला. खरतर हा सामना चेन्नईचं जिंकणार असे वाटत होते, मात्र मधल्या फळीतीली फलंदाज सपशेल अपयशी ठरले. यात सर्वांचा टीकांचा धनी ठरला केदार जाधव.
 
कोलकात्याने दिलेल्या 168 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना फाफ ड्यु प्लेसिस आणि शेन वॉट्सनने चेन्नईला 3.4 ओव्हरमध्येच 30 रनची पार्टनरशीप करून दिली. ड्यु प्लेसिस आऊट झाल्यानंतरही वॉटसनने रायुडूच्या मदतीने कोलकात्याच्या बॉलरवर आक्रमण सुरूच ठेवलं. मात्र यानंतर चेन्नईची पडझड सुरू झाली.
 
12 ओव्हरपर्यंत चेन्नईची सामन्यावर पकड होती. मात्र रायडू बाद झाल्यानंतर धोनी मैदानाता आता. त्यानं 12 चेंडूत केवळ 11 धावा केल्या आणि बाद झाला. धोनी बॅटिंग करत होता तेव्हा संघाला 47 चेंडूत 69 धावांची गरज होती. धोनी बाद झाल्यानंतर ब्राव्हो मैदानावर येईल असे वाटत होते. मात्र मैदानावर आला केदार जाधव.
 
धोनी प्रमाणेच केदार जाधवनं धिमी फलंदाजी केली. त्यानं 12 चेंडूत केवळ 7 धावा केल्या. जाधव फलंदाजीसाठी आला तेव्हा चेन्नईला 21 चेंडूत 39 धावांची गरज होती. दुसरीकडे जडेजानं 8 चेंडूत 21 धावा केल्या, तर केदार जाधव मात्र सिंगल धावाही काढत नव्हता. चेन्नईला 10 धावांनी पराभव झाल्याचा विश्वास चाहत्यांनाही बसला नाही. त्यानंतर चाहत्यांनी केदार जाधवला ट्रोल करण्यात सुरुवात केली.
 
काही चाहत्यांनी केदार जाधवला CSKमधून काढून टाकावे यासाठी एक पेटिशन लिहिले आहे. यात त्यांनी केदारला संघात जागा देऊ नका, तो आयपीएलमध्ये कसोटी क्रिकेट खेळतो, असे टीका करण्यात आली आहे. एवढेच नाही तर फलंदाजी करतानाचा एका व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
 
या व्हिडीओमध्ये केदार जाधव फिल्डिंग पाहत आहे, मोठे शॉट खेळण्यासाठी. यावर चाहत्यांनी मस्त अभिनय केलास, अशा कमेंट केल्या आहेत.
 
चेन्नईनं 12 ओव्हरमध्ये एक विकेट गमावत 99 धावा केल्या होत्या. तर, पुढच्या 48 चेंडूत 69 धावा करण्याची गरज होती, तेव्हा 9 विकेट गमावल्या. या 48 चेंडूंपैकी 20 चेंडूंवर एकही धाव काढली नाही. यातील 12 चेंडू केदार जाधवनं खेळल्या.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती