मुंबई इंडियन्सचे आव्हान

शनिवार, 6 मे 2017 (10:23 IST)
विजयाची गरजदिल्ली डेअरडेव्हिल्सला?नवी दिल्ली : दहाव्या आयपीएलचा ४५ वा सामना गुणांच्या तक्त्यात सर्वोच्च स्थानावर असलेल्या मुंबई इंडियन्स आणि सहाव्या स्थानावर असलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्स संघांमध्ये येथील सर फिरोजशाह कोटला मैदानावर खेळला जाईल. दोन वेळा विजेता ठरलेल्या मुंबई इंडियन्सने दहापैकी आठ सामने जिंकून सोळा गुणांसह यंदाच्या आयपीएलमधील पहिल्या चार संघांमध्ये आधीच आपले स्थान पक्के केले आहे. दिल्ली संघाने गुरुवारी गुजरात लायन्सवर थरारक विजय मिळवून पहिल्या चार संघांमध्ये स्थान मिळवण्याच्या दिशेने कूच केली आहे.
 
कर्णधार रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी केली आहे. या संघाचे वैशिष्ट्य म्हणजे हा संघ रोहित शर्मा, केरॉन पोलार्ड अथवा लसिथ मलिंगाच्या एकट्याच्या कामगिरीवर अवलंबून नाही. प्रत्येक सामन्यामध्ये कोणी ना कोणी चांगली कामगिरी करत आहे. पार्थिव पटेल आणि जोस बटलरने अनेक सामन्यांतून संघाला चांगली सुरुवात करून देताना आपल्या सहकार्‍यांवर षटकामागे धावांच्या वेगाचे दडपण येणार नाही, याची काळजी घेतली आहे. नितीश राणाने अनुभवी फलंदाजाप्रमाणे फटकेबाजी केली आहे. हार्दिक आणि कृणाल पंड्या बंधूंनी अष्टपैलू कामगिरीचे प्रात्यक्षिक घडवले आहे.

वेबदुनिया वर वाचा