व्हर्च्युअल जॉब इंटरव्ह्यूसाठी खास टिप्स जाणून घ्या

शनिवार, 19 जून 2021 (22:12 IST)
सध्या कोरोना व्हायरस मुळे जवळ जवळ सर्व जॉब इंटरव्यू अमोर समोर न घेता व्हर्च्युल होऊ लागले आहे.या साठी उमेदवारांना काही तयारी करावी लागणार.कारण योग्य कम्युनिकेशनच आपल्याला यश मिळवून देऊ शकत.आणि या मुळे आपल्याला आपले ध्येय गाठणे सहज होईल.  
चला तर मग जाणून घेऊ या.काही टिप्स.
 
1 डेस्कटॉप किंवा लॅपटॉप वापरा-जर आपण फोनवर कॉल घेता तर कॉल ड्रॉप होणं किंवा  नेटवर्कखराब होण्याची समस्या होऊ शकते आणि फोन हातात धरून ठेवल्यावर हात देखील हलू शकतो म्हणून व्हर्च्यूवल इंटरव्यू देताना नेहमी डेस्क टॉप किंवा लॅपटॉप निवडा.
 
2 फॉर्मेटची माहिती घ्या -मुलाखत घेणाऱ्याला आधीपासूनच विचारा की ते कोणता सॉफ्टवेयर वापरण्यात घेणार आहे.किती जण इंटरव्यू घेणार आहे.या बद्दल संपूर्ण माहिती घ्या.
 
3 तंत्रज्ञानाबद्दल जाणून घ्या-मुलाखतीपूर्व काही इंटरव्यू चे व्हिडीओ बघून माहिती मिळवा.आपण कनेक्ट, रिकनेक्ट,वोल्ह्यूम कसे एड्जस्ट करायचे हे जाणून घ्या.जेणे करून आपण स्वतःला कॅमेऱ्यावर परफेक्ट दर्शवू शकता.या गोष्टींची माहिती नसेल तर काळजीमुळे आपले इंटरव्यू खराब होऊ शकते.
 
4 फॉर्मल कपडे घाला-असं म्हणतात की प्रथम भेट ही अमिट छाप सोडते. म्हणून स्वतःला परफेक्ट ठेवा.आपले कपडे आधीपासून निवडून ठेवा.आपण सॉलिड रंगाचे कपडे घालू शकता, जेणे करून ते व्हिडीओ मध्ये चांगले दिसतात.
 
5 सराव करा-आपण आपल्या मित्र, किंवा कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने मुलाखतीच्या पहिल्या सत्राचा सराव करू शकता.आपल्याला हे लक्षात ठेवायचे आहे की आय कॉन्टॅक्ट ठेवा आणि आपल्या बॉडी लॅंग्वेज कडे लक्ष द्या.  
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती